भारत जगात विश्वगुरू होऊ शकतो, यासाठी सर्व हिंदूंनी संघटित होणे गरजेचे : डॉ. मोहन भागवत

Foto
संघाच्या शंभर वर्षांच्या प्रवासानिमित्त गंगापूरात भव्य हिंदू धर्म संमेलन राष्ट्रप्रेम, शिस्त व सहनशीलतेचा संदेश

गंगापूर, (प्रतिनिधी): आपला देश विविध जाती धर्माचा असून विविध परंपराने नटलेला आहे. समाजाने संघटित होऊन हिंदू समाजाच्या प्रत्येक न्यातीने एकत्र येऊन सर्वसामान्यांची मैत्री करून त्यांचे प्रश्न समजून घ्यावे त्यामुळेच आपला देश संघटित होऊन शक्ती युक्ती व बाळाने मोठा होऊन जगात विश्वगुरू होऊ शकतो यासाठी सर्व हिंदूंनी संघटित होणे गरजेचे आहे. अशी आव्हान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर संघ चालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

गंगापूर येथे शुक्रवार (दि.१६) रोजी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान हिंदू संमेलनाचे जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने देशातील पहिले हिंदू संमेलन गंगापूर येथे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर संघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी समाजातील विविध विषया प्रकाश टाकीत व देशासाठी व समाज हितासाठी काय केले पाहिजे या विषयावर तब्बल एक तास आपल्या शैलीतून मार्गदर्शन केले.

याप्रसंगी प्रामुख्याने देवगड संस्थांचे प्रमुख गुरुवर्य भास्करगिरी महाराज, सरला बेट गोदावरी आमचे प्रमुख गुरुवर्य रामगिरीजी महाराज, वेरूळ येथील जनार्दन स्वामी संस्थांचे प्रमुख महामंडळेश्वर शांतिगिरी जी महाराज हे उपस्थित होते. तर प्रकृती खराब असल्याचे कारणाने गाथा मूर्ती महाराज राऊत हे उपस्थित राहू शकले नाही. याप्रसंगी भास्करगिरी महाराज म्हणाले की आपल्या घरात एकोपा ठेवा जगात शंभर वर्षाची परंपरा असलेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हीच एकमेव संघटना असून अनेक सुखदुःख मान अपमान सहन करीत त्यांनी आपली वाटचाल चालू ठेवली आहे. संघ परिवार हा विचारांचा समजूतदारपणाचा स्वकृतीने चालणारा परिवार आहे. तर कुत्रे सांभाळण्यापेक्षा गाई संभाळा आशा आव्हाने त्यांनी केले.

तर रामगिरी महाराज म्हणाले की दुसन्यांना होणारे दुःख होणारा त्रास बघून स्वतःला जो सुखी समजतो व कार्य करतो तोच हिंदू आहे. अन्याय सहन करण्याची क्षमता हिंदू धर्मात आहे परंतु अन्यायला प्रतिकार करून त्याला अन्य योग्य नसल्यास त्याचा प्रतिकार करून त्याचे समूळ उच्चाटन करण्याची शिकवण सुद्धा आपल्या धर्माने दिले आहे. आपल्या धर्मातील प्रत्येक सणाचे वेगवेगळे ऋतू रूपात महत्त्व आहे. आपल्या परंपरा आपली संस्कृती कायम ठेवा अशी आव्हान त्यांनी केले. तर शांतिगिरी जी महाराज म्हणाले की देशाच्या व हिंदू धर्माचा विकासासाठी प्रत्येकाने स्वदेशीचा वापर करावा सेंद्रिय शेती करावी ज्यामुळे देशातील नागरिक सक्षम होईल विदेशी वस्तूंचा व भाषेचा वापर टाळा आपल्या घरात आपल्याच धर्माचे शिक्षण द्या. मम्मी पापांच्या अर्थ जाणून घ्या ते वापरायचे का नाही याचा पण आपण विचार करा.

 विदेशी परंपरा सोडून आपल्या देशाची परंपरा जपा त्यामुळेच आपला धर्म स्वबळावर उभा राहून जगात मोठा होईल. हाप्रसंगी मनीष वर्मा यांनी गुरुवर्य रामभाऊ महाराज राऊत यांनी पाठवलेला संदेश वाचून दाखवला. या कार्यक्रमात महिलांनी पिवळा साड्या परिधान केल्या होत्या. जिल्हा परिषद प्रशाला चे संपूर्ण अंगण खचाखच भरले होते. फार मोठ्या प्रमाणात डॉक्टर मोहनजी भागवत यांचे विचार ऐकण्यासाठी हिंदू समाजातील नागरिक महिला युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
देशाचा स्वाभिमान, संस्कृती आणि संस्कार जपणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून, समाजसेवा, गोसंवर्धन, स्वच्छता आणि संघटनात्मक कार्यात सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. या भारत देश विविध जाती, धर्म, भाषा आणि वेशभूषांचा संगम असून, देश के निवासी सभी नागरिक एक जन एक हैफक्र हा एकात्मतेचा संदेश यावेळी देण्यात आला. 

सूत्रसंचालन अतुल कुलकर्णी परिचय रविराज दारुंटे यांनी तर हिंदू संमेलनाचे महत्व सुनील चक्रे यांनी सांगितले. नियोजक समितीचे अध्यक्ष कृष्णा मनाळ यांनी आभार मानून व पसायदान करून महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली, यावेळी उपस्थित संत महंतांचा विशेष उल्लेख करत, हिंदू धर्मामध्ये आत्मपरीक्षण व चुका दुरुस्त करण्याची ताकद असल्याचे सांगण्यात आले. कोणाकडून चूक झाल्यास त्याला समजावून सांगण्याची क्षमता हिंदू धर्मात असून, नव्या संघटनांच्या माध्यमातून समाजप्रबोधन सुरू राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.